दाभोळकर, पानसरे हत्येप्रकरणी सनातनच्या प्रमुखांची चौकशी

महाराष्ट्र एसआयटीकडून गोव्यात दोन दिवस कसून चौकशी

एमपीसी न्यूज – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासकामी महाराष्ट्र एसआयटीने सनातनचे प्रमुख जयंत आठवले यांची कसून चौकशी केली. गोव्यामध्ये असलेल्या सनातनच्या आश्रमात दोन दिवसांपासून चौकशी सुरु होती. 

 

दाभोळकर आणि पानसरे हत्येप्रकरणी सनातनच्या समीर गायकवाडला तसेच मुंबईतून हिंदू जनजागृती समितीच्या डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक करण्यात आली आहे.

 

डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 या वर्षी पुण्यात दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. या हत्येचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आल्यानंतर 9 मे 2014 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘सीबीआय’ने गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचा आरोप होत होता. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे दिनांक 16 फेब्रुवारी 2015 रोजी मारेकऱ्यांनी गोळया झाडल्या होत्या. या हल्ल्यात त्यांचा 20 फेब्रुवारीला मृत्यू झाला होता त्यावेळी ते 82 वर्षांचे होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.