पं. स. भ. देशपांडे यांना शनिवारी संगीत सभेतून आदरांजली

एमपीसी न्यूज – संगीतासाठी आयुष्य वेचलेल्या महामहोपाध्याय पं. स. भ. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना सांगितीक आदरांजली देण्यासाठी त्यांच्या शिष्यवृंदाच्या वतीने संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम शनिवारी (दि.4) पुण्यात शनिवार पेठेतील विष्णू विनायक स्वरमंदिर सभागृह, गांधर्व विद्यालय येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे. यावेळी पं. डॉ. विकास कशाळकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे.

तसेच यावेळी संध्या हरिष देशमुख आणि  चारुता मिलिंद आपटे  यांचे गायन तर विजय गोविंदराव देशमुख यांचे हार्मोनिअम वादनाचे सादरीकरण होणार आहे. याला तबल्यावर अनिरुद्ध देशपांडे आणि हार्मोनिअमवर केदार देशमुख साथसंगत करणार आहेत.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वाटचालीत मोलाचे योगदान असलेले गायक, रचनाकार, संगीत प्राथमिक ते अलंकारपर्यंतच्या पुस्तकांचे अभ्यासू लेखक अशी पंडीतजींची ख्याती होती. तर कार्यक्रमात त्यांनीच रचलेल्या बंदिशींचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन मंजिरी अभिजित तिक्का करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.