वाईकरांनी साजरे केले ‘कन्यागत’ महापर्व

कृष्णा नदीचे पात्र झाकले साडीने

एमपीसी न्यूज – एका तपानंतर होणा-या गंगा आणि कृष्णा नदीच्या संगमाचा पवित्र सोहळा आज (रविवारी) सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये प्रथेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साडी-चोळी अर्पण करून ‘कन्यागत महापर्व’ करण्यात आले.

कृष्णाकाठी बसलेल्या वाईमध्ये दर 12 वर्षानंतर गंगा अवतरते, अशी अख्यायिका आहे. लोकभावनेनुसार एका तपानंतर कन्यागत महापर्व साजरे केले जाते. त्यानुसार कृष्णानदीला साडी-चोळी अर्पण केली जाते. धार्मिक प्रथेप्रमाणे महिला नदीचे पात्र साडीने झाकतात. त्याचे पुजन करतात.

साडी-चोळी, खणा नारळाने नदीची ओटी भरली जाते. कृष्णा आणि गंगा नदीच्या संगमाचे स्वागत केले जाते. गंगा नदीचे उगम कन्यागत महापर्वात होते. महापर्वात गंगा नदी सातारा भागात अवतरते असे मानले जाते.

कृष्णा नदीवर  वाई येथे सात घाट आहेत. पाच ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. यंदाचे महापर्व असल्यामुळे सातही घाटाच्या ठिकाणी  कृष्णा नदीचे पात्र साडीने झाकण्याचा कार्यक्रम केला गेला. हा  अद्भुत आणि पवित्र सोहळा वाईकरांना तब्बल 12 वर्षांनी अनुभवायला मिळाला. रविवारी झालेल्या कार्यक्रमात महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हा संगम सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

 

(सर्व छायाचित्रे ऋषिकेश तपशाळकर)

"19"
"1"
"2"
"3"
"4"
"5"
"6"
"7"
"8"
"9"
"10"
"11"
"12"
"14"
"15"
"16"
"17"
"18"
"20"
"21"

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.