शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

पिंपरीत उद्या मोफत केस व त्वचा विकार तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – वेदांग आयुर्वेद आणि पंचकर्म रुग्णालयाच्या वतीने उद्या (रविवारी) संगणक व अत्याधुनिक मशीनद्वारे केसांची (trichoscopy) व त्वचा विकार मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरीतील, मासुळकर कॉलनीतील पंचकर्म रुग्णालयामध्ये रविवारी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत हे शिबिर होणार आहे.

या शिबिरामध्ये केसांची वाढ न होणे, केस गळतीच्या समस्या, चाई येणे, टक्कल पडणे तसेच तारुण्यपिटिका, खरूज, नायटा, डाग, सोरियासिस, इसब व विविध त्वचेच्या विकारांची तपासणी करण्यात येणार आहे.

शिबिराचा जास्तीत -जास्त  लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9822 592534 या क्रमांकावर संपर्क साधावा.

spot_img
Latest news
Related news