शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

कासारवाडीत रेल्वेच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – लोणावळा-पुणे लोकलची धडक बसून अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.7) रात्री आठच्या सुमारास कासारवाडी रेल्वे स्थानक येथे घडली. 

मृत्यू झालेल्या इसमाचे वय अंदाजे 58 असून ओळख पटू शकलेली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, अनोखळी इसम कासारवाडी रेल्वे स्थानक येथून जात होता. त्यावेळी लोणावळा-पुणे लोकलने धडक दिल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाला. 

इसमाचे वय अंदाजे 58 आहे. उंची चार फुट चार इंच, चेहरा उभट, नाक सरळ, रंग काळा सावळा, डोक्याचे केस काळे असे वर्णन आहे. निळा-काळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची लुंगी परिधान केली आहे. कासारवाडी रेल्वे पोलीस तपास करत आहेत.

spot_img
Latest news
Related news