शनिवार, डिसेंबर 3, 2022

तळेगाव आणि वडगावमध्येही महिला दिन उत्साहात

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज वेगवेगळे उपक्रम घेत सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने शाळा महाविद्यालयांमध्येही कार्यक्रम घेतले जात आहेत.

इंद्रायणी महाविद्यायात जागतिक माहिलादिनानिमित्त ‘आपला पोलीस आपला भाऊ’ जनजागृती पोस्टर लावण्याचा कार्यक्रम झाला. युवती व महिलांच्या होणाऱ्या छेडछाडी संदर्भात तक्रारीसाठी पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांनी मोबाईल नंबर जाहीर केले आहे. यावेळी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष विलास काळोखे, सचिन भांडवलकर, नितीन शाह, श्रीकांत वाईकर, सुरेश शिंदे, दिलीप डोळस, दिलीप पारेख, सुरेश शिंदे इ. व महाविद्यालयीन विद्यार्थीनी मोठ्या संखेने उपस्थित होते. ही जनजागृती पोस्टर्स तळेगाव परिसरातील सगळी महाविद्यालय, शाळा, क्लासेस व सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आली आहेत.

पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांचे मोबाईल नंबर जाहीर झाल्यामुळे महिला व मुलींना तक्रार करणे सोईचे झाले आहे. तसेच तक्रार करणाऱ्यांच्या नावाबाबत गुप्तता पाळण्याबाबत मा. पोलीस निरीक्षक मुगूटराव पाटील यांनी सांगितले आहे.

वडगावमधील पंचमुखी अंगणवाडी येथे महिला दिनाच्या निमित्ताने सत्कार

वडगाव येथील खंडोबा मंदिराजवळील पंचमुखी अंगणवाडी येथे अंगणवाडी सेविका अर्चना ढोरे मदतनीस चेतना ढोरे यांच्या वतीने परिसरातील ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच विध्यार्थ्यांच्या पालकांचेही गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी स्त्री जन्माचे स्वागत, भारतीय क्रांतिकारक महिला या विषयावर माहिती देण्यात आली. यावेळी विमल वहिले, कोकिळा रावल, बेबीताई चव्हाण, प्रणाली वाहिले, सुषमा जैन आदी उपस्थित होते.

"talegaon

 

 

Latest news
Related news