सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

भोसरीत पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज – पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरून नेणा-या एकाला भोसरी, एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी (दि.10) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भोसरी येथे घडली.

सूरज चंद्रकांत कुहाडे (वय 19, रा. बालाजीनगर, भोसरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 25 वर्षीय महिलेने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला शुक्रवारी सायंकाळी भोसरी येथील एका कंपनीसमोरून जात होत्या. त्यावेळी आरोपी सूरज तिथे आले. त्याने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील 14 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून चोरून नेले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एमआयडीसी ठाण्याचे फौजदार ईश्वर जगदाळे तपास करत आहेत.

spot_img
Latest news
Related news