सचिन शेळके खूनप्रकरणातील फरार आरोपीला बीडमधून अटक

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके खून प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी (दि.10) रात्री बीड जिल्ह्यातून अटक केली.

 

अमोल अनिल लोंढे (वय 21, रा. चाकण ता. खेड, मूळ बोधेगाव ता. परळी वैद्यनाथ जि. बीड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे मोक्का न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने (दि. 16) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

 

माजी नगराध्यक्ष सचिन बाळासाहेब शेळके (वय 38, रा. तपोधाम कॉलनी तळेगाव दाभाडे) यांचा पूर्ववैमनस्यातून 16 ऑक्टोबर 2016 रोजी खांडगे पेट्रोलपंपजवळ खून केला. त्यांच्या खुनातील आरोपी अमोल लोंढे हा गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

 

आरोपी लोंढे हा त्याच्या गावी बीड येथे लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. देहूरोड उपविभागीय पोलीस अधिकारी बरकत मुजावर, पोलीस निरीक्षक एम.बी. पाटील, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस हवालदार विनोद शिंदे, अनिल शिंदे, प्रशांत भुनगे यांचे पथक बीडला रवाना झाले. त्यांनी सापळा रचून घरात लपून बसलेल्या आरोपी लोंढे याला गजाआड केले.

 

पुणे मोक्का न्यायालयात आरोपी लोंढे याला नेले असता न्यायालयाने गुरुवारी (दि.16) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.