वारजेत शाळकरी मुलीचा विनयभंग करणा-या स्कुलबस चालकास अटक

एमपीसी न्यूज – स्कुलबसचालकाने दहा वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी 65 वर्षीय स्कुलबस चालकास अटक केली.

संबंधीत मुलगी वारजे परिसरातील एका शाळेत विद्यार्थीनी आहे. हा सर्व प्रकार एप्रील 2016 ते 10 मार्च 2017 या दरम्यान घडला. आरोपी हा . पिडीत मुलीला शाळेत सोडण्याची आणि घरी सोडणा-या स्कुलबचा आरोपी चालक आहे. दरम्यान वर नमूद केलेल्या कालावधीत आरोपीने पिडीत मुलीला आपल्या शेजारच्या सिटवर बसवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिचा विनयभंग केला.

पोलीस उप निरीक्षक  एस.एन.निकम अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.