‘पृथ्वी एडिफाईस करंडक’ स्पर्धेत इन्फोसिस संघाला विजेतेपद !!

आंतर माहीती तंत्रज्ञान ट्वेन्टी-20 अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

एमपीसी न्यूज –  व्हाईट कॉपर तर्फे आयोजित तर्फे ‘पृथ्वी एडिफाईस करंडक’ आंतर माहीती तंत्रज्ञान ट्वेन्टी-20 अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत इन्फोसिस संघाने टीसीएस संघाचा 8 गडी राखून पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

नेहरू स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यामध्ये टीसीएस संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. सावध सुरूवात करताना टीसीएसच्या गौरव सिंग (77) व मयांक जसोरे (43) या सलामीवीरांनी 53 चेंडूत 76 धावांची भागिदारी केली. पण यानंतर संघाला धावांचा वेग वाढविताना अपयश आले. टीसीएस संघाने 20 षटकात 3 गडी 160 धावांचे आव्हान उभे केले.


या आव्हानाचा पाठलाग करताना इन्फोसिस संघाची सलामीची जोडी स्वस्तात परतली. पण त्यानंतर आलेल्या कर्णधार आशय पालकर (नाबाद 60 धावा) आणि साईनाथ शिंदे (नाबाद 63) या दोघांनी संघाच्या डावाला आकार देताना तिसर्‍या गड्यासाठी 71 चेंडूत नाबाद 111 धावांची अभेद्य भागिदारी करताना संघाला सामन्यात विजय मिळवून देत व विजेतेपदाला गवसणी घातली.


स्पर्धेचे पारितोषिक वितरण पृथ्वी एडिफाईसचे कार्यकारी संचालक अभय केळे व पुणे365 चे संचालक आनंद कन्सल यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या इन्फोसिस संघाला करंडक, पदके व 50 हजार रूपये देण्यात आले.  उपविजेत्या टीसीएस संघाला करंडक, पदके व 40 हजार रूपये देण्यात आले.  मालिकावीर हा किताब इन्फोसिसच्या आशय पालकर याला (327 धावा व 3 विकेट) देण्यात आला. सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब टीसीएसच्या मयांक जसोरे (365 धावा) याला तर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब टीसीएसच्याच गौरव सिंग (15 विकेट) याला देण्यात आला. या तिघांना करंडक व पाच हजार रूपयांचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकालः अंतिम फेरीः

1) टीसीएसः 20 षटकात 3 गडी 160 धावा (गौरव सिंग 77 (57, 8 चौकार, 3 षटकार), मयांक जसोरे 43 (27, 7 चौकार, 1 षटकार), विक्रमजीत सिंग 24 (20, 1 चौकार, 1 षटकार), सुशांत बंसल 1-17); (भागिदारी-पहिल्या गड्यासाठी मयांक आणि गौरव 76 (53 चेंडू)

2) इन्फोसिसः 18.5 षटकात 2 गडी बाद 163 धावा (साईनाथ शिंदेनाबाद 63 (46, 6 चौकार, 2 षटकार), आशय पालकर नाबाद 60 (34, 5 चौकार, 3 षटकार), संदीप सांगघाई 25, मयांक जसोरे 1-15);(भागिदारीः तिसर्‍या गड्यासाठी आशय आणि साईनाथ नाबाद 111 (71);

सामनावीर- साईनाथ शिंदे;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.