युनियन बँक ऑफ इंडिया संघाला विजेतेपद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धा

एमपीसी न्यूज – पुणे महानगर पालिके (पीएमसी) तर्फे आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेत युनियन बँक ऑफ इंडिया संघाने इनकम टॅक्स्-सेंट्रल एक्साईज संघाचा 2-1 असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सुरू असलेल्या स्पर्धेत आज झालेल्या अंतिम सामन्यात युनियन बँक ऑफ इंडिया संघाने पिछाडीवरून जिगरबाज खेळ करून विजेतेपदाला गवणसी घातली. इनकम टॅक्स आणि सेंट्रल एक्साईजच्या नितीन कुमार याने 10 व्या मिनिटाला गोल संघाचे खाते उघडले व महत्वपूर्ण सामन्यामध्येआघाडी घेतली. त्यानंतर 18 मिनिटांनी तिकाराम याने गोल करून युनियन बँकेला 1-1 अशी बरोबरी निर्माण करून दिली. विश्रांतीनंतरही 1-1 अशी बरोबरी होती.55 व्या मिनिटाला तिकाराम याने आणखी एक गोल करून संघाला निर्णायक विजय मिळवून दिला.

तिसर्‍या स्थानासाठी झालेल्या सामन्यामध्ये सेंट्रल रेल्वे(पुणे विभाग) संघानेहॉकी सांगली संघाचा 3-2 असा पराभव करून विजय मिळवला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएलसी जयदेव गाकवाड, हॉकी महाराष्ट्रचेअध्यक्ष हितेश जैन, हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष परशुराम वाडेकर व मनीष आनंद, सचिव मनोज भोर, विशांत मोरे, लिऑन जॉन, स्पर्धा संचालक स्टॅनली डिसुझा, श्रीधरण तांबा व सागर ठाकूर यांच्या हस्ते झाले. सर्वाधिक गोल करणारा हा मान (आशितोष लिंगेश (इनकम टॅक्स), बेस्ट फॉवर्ड वैंकटेश देवकर (इनकम टॅक्स्), बेस्ट हाफ जितेंद्र सिंग (मध्य रेल्वे) व बेस्ट बॅक उदय कुर्वे(हॉकी सांगली) व सर्वोत्कृष्ट गोलरक्षक (सुरज काकेरा (युबीआय, मुंबई) या खेळाडूंना देण्यात आला.

विजेत्या युनियन बँक संघाला 75 हजार रूपये तर, उपविजेत्या इनकम टॅक्स् संघाला 50 हजार रूपयांचे पारितोषिक मिळाले. तिसर्‍या क्रमांकाच्या सेंट्रल रेल्वे संघाला 25 हजार रूपयेदेण्यात आले. माजी राष्ट्रीय हॉकी पंच हॅरी अ‍ॅन्थोनी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच अब्दुल सलामी (प्रियदशर्नी एससी) व शादाब सय्यद (इनकर टॅक्स्) यांना स्पर्धेचे उदयोन्मुख खेळाडू हा किताब देण्यात आला.

स्पर्धेचा निकालः अंतिम फेरी

युनियन बँक ऑफ इंडियाः 2 (तिकाराम 28, 55 मि.) वि.वि. इनकम टॅक्स आणि सेंट्रल एक्साईजः 1 (नितीन कुमार 10 मि.); हाफटाईमः 1-1;

तिसर्‍या स्थानासाठीः सेंट्रल रेल्वे(पुणे विभाग)ः 3 (भूषण ढेरे 13, प्रकाश घुमरे 55 मि., विनोद बिबोरे 58 मि.) वि.वि. हॉकी सांगलीः 2 (संतोष बिराजदार 4 मि., नितीन पाटील 38 मि.); हाफटाईमः 1-1;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.