खेड पंचायत समितीवर भगवा फडकला

(अविनाश दुधवडे)

एमपीसी न्यूज – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे  यांच्या आदेशानुसार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार सुरेश गोरे यांचे मार्गदर्शनाखाली खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सुभद्रा शिंदे तर उपसभापतीपदी काँग्रेसचे अमोल पवार यांची बहुमताने निवड झाली.

यावेळी आमदार सुरेश गोरे, पंचायत समितीचे सदस्य भगवान पोखरकर, अंकुश राक्षे, अमर कांबळे, सुनिता सांडभोर,ज्योती अरगडे, वैशाली जाधव, जिल्हाप्रमुख राम गावडे,  जिल्हा समन्वयक अँड.गणेश सांडभोर, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, पुणे जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, तनुजा घनवट, रूपाली कड, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, राजु जवळेकर, कैलास गाळव, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे,  ग्राहक संरक्षण कक्षाचे लक्ष्मण जाधव, शेतकरी सेनेचे एल.बी.तनपुरे, राहूल गोरे, संजू घनवट, माजी तालुकाप्रमुख सुरेश आण्णा चव्हाण, बिपीन रासकर तसेच शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.