रावेत परिसरात अवैध धंदे चालणा-या हॉटेल्सवर देहूरोड पोलिसांची कारवाई

कारवाईत 12 जणांना अटक तर 2 जण पसार

एमपीसी न्यूज – देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोंडवे कॉर्नर रावेत येथील काही हॉटेल्समध्ये अवैध धंदे चालू असल्याची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी गुरुवारी (दि. 16) या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 12 जणांना अटक केली असून 43 जणांना समजपत्र देऊन सोडण्यात आले मात्र 2 जण पसार झाले आहेत.

हॉटेल ब्लु बेरी, हॉटेल झूम इन आणि हॉटेल गुणाजी अशी कारवाई झालेल्या हॉटेल्सची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही हॉटेल्समध्ये अवैध धंदे चालू असल्याची बातमी मिळताच देहूरोड पोलिसांनी आणि तळेगाव पोलिसांनी कारवाई केली.  यामध्ये हॉटेल ब्लु बेरीतून 12 आरोपींना अटक केली असून 16 हजार 541 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेत तर हॉटेल झूम इनमधून 2 अरोपींना अटक केली आहे, 1 आरोपी पसार आहे तर 37 हजार 125 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तसेच हॉटेल गुणाजी येथील दोन्ही आरोपी पसार झाले असून 11 हजार 145 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर 43 जणांना समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक अरुण मोरे, देहूरोड पोलीस ठाण्यातील स्टाफ आणि तळेगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दिंडोरे आणि त्यांचा स्टाफ यांनी देहूरोड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.