मार्केटयार्ड येथे घराजवळ पार्क केलेल्या दोन कार जाळल्या

पाच लाखांचे नुकसान

एमपीसी न्यूज – मार्कटयार्ड येथील संदेश पार्क सोसायटीतील घराजवळ पार्क केलेल्या आय-10 आणि नॅनो अशा दोन कार अज्ञात इसमांनी पेटवून दिल्या.

यामध्ये कार पूर्णपणे जळाल्या असून तब्बल 5 लाख 30 हजाराचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अक्षय गुप्ते (वय-30, रा.मार्केटयार्ड, पुणे) यांनी मार्केटयार्ड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अक्षय यांच्या घराजवळ पार्क केलेली त्यांची आय-10 आणि त्यांच्या चुलत्यांची नॅनो कार अज्ञांतांनी पेटवून दिल्या. पोलीस उप निरीक्षक पी.पी.ढवण अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.