लोणावळा धरण भरले; इंद्रायणी काठच्या गावांना सतर्कतेचे इशारा

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील टाटा कंपनीचे लोणावळा धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने पावसाचा अंदाज घेऊन धरणातील पाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा मावळचे तहसिलदार रणजिद देसाई यांनी दिला आहे.

टाटा कंपनीच्या लोणावळा धरणातून भिवपुरी येथिल विज निर्मिती केंद्राला पाणी सोडण्यात येते. मात्र खोपोली व रायगड जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने बहुतांश नद्यांना पुर आला असल्याने लोणावळा धरणातील पाणी रायगड जिल्ह्यात न सोडता लोणावळ्यातून वाहणार्‍या इंद्रायणी नदीत सोडण्यात येणार असल्याचे पत्र टाटा कंपनीने मावळ प्रशासनाला दिले आहे.

या पत्राचा हवाला देत तहसिलदार देसाई यांनी सर्व पोलीस व प्रशासकिय यंत्रणांना याबाबत सुचित करुन नदीकाठच्या घरांना व नागरिकांना सतर्क राहण्याबाबत कळविले असून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात यावे असे सुचित केले आहे. वास्तविक लोणावळ्यातून वाहणार्‍या इंद्रायणीला देखिल सर्वत्र पुल आला आहे. असे असताना या नदीपात्रात पाणी सोडल्यास लोणावळा शहरात पाणी घुसण्याची भिती वर्तवली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.