पहिल्या नेटसर्फ कॉर्पोरेट व्हॉलिबॉल अजिंक्यपद 2017 स्पर्धेत टीसीएस संघाला विजेतेपद

एमपीसी न्यूज – स्पोर्ट आय लव्ह व महाराष्ट्र क्रीडा आयोजित पहिल्या नेटसर्फ कॉर्पोरेट व्हॉलिबॉल अजिंक्यपद 2017 स्पर्धेत पुरूष व महिला गटात टीसीएस संघाने अनुक्रमे इन्फोसीस व अॅमडॉक्स्‌ संघांचा पराभव करत विजेतेपद संपादन केले.

सिंबायोसिस स्कूल सेंटर, प्रभात रोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत  पुरूष गटात उपांत्य फेरीच्या लढतीत टीसीएस संघाने टेक महिंद्रा संघाचा 2-1(20-25, 25-22, 15-11) असा तर इन्फोसिस संघाने अॅमडॉक्स्‌ संघाचा 2-0(25-23, 25-9) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला गटात उपांत्य फेरीच्या लढतीत अॅमडॉक्स्‌ संघाने टेक महिंद्रा संघाचा 2-0 (25-17, 25-22) असा तर टीसीएस संघाने इन्फोसिस संघाचा 2-1(25-20, 21-25, 16-14) असा पराभ करत अंतिम फेरी गाठली.

अंतिम फेरीच्या लढतीत पुरूष गटात पुष्पेंद्र सिंगच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर टीसीएस संघाने इन्फोसिस संघाचा 2-0 (27-25, 25-18), असा पराभव करत विजेतेपद संपादन केले. महिला गटातही टीसीएस संघाने बाजी मारत अॅमडॉक्स्‌ संघाचा 2-1(22-25, 25-16, 15-3), असा तीन सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या पुरूष व महिला टीसीएस संघाला करंडक व 15000 रुपये रोख रक्कम, असे परितोषिक देण्यात आले तर उपविजेत्या इन्फोसिस व अॅमडॉक्स्‌ संघांना करंडक व 10000 रुपये रोख रक्कम, असे परितोषिक देण्यात आले. तसेच टीसीएस संघाचे दोन्ही मलिकावीर आशिष तोमर व प्रिती आर यांना करंडक व 5000 रुपये रोख रक्कम असे परितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सिंबायोसिस स्कुलचे रजिस्ट्रार मिलींद चौधरी व पुणे जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे सचिव शाम पलसुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पोर्टस् आय लव्हचे संचालक अमेय येरवडेकर यांनी यावेळी आभार प्रदर्शन केले.

स्पर्धेचा सविस्तर निकालः उपांत्य फेरीः पुरूष गट

टीसीएस वि.वि टेक महिंद्रा 2-1(20-25, 25-22, 15-11) सामनावीर- श्रिकांत पाटील

इन्फोसिस वि.वि अॅमडॉक्स्‌ 2-0(25-23, 25-9) सामनावीर अक्षय गुजर

 

महिला गटः

अॅमडॉक्स्‌ वि.वि टेक महिंद्रा 2-0(25-17, 25-22) सामनावीर- शितल खत्री
टीसीएस वि.वि इन्फोसिस 2-1(25-20, 21-25, 16-14) सामनावीर- प्रिती आर
अंतिम फेरी- पुरूष गट
टीसीएस वि.वि इन्फोसिस 2-0(27-25, 25-18) सामनावीर- पुष्पेंद्र सिंग

मालिकावीर- आशिष तोमर

महिला गटः

टीसीएस वि.वि अॅमडॉक्स्‌ 2-1(22-25, 25-16, 15-3) सामनावीर- सायली बोराडे

मालिकावीर- प्रिती आर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.