बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

भाजप 93, रिपाइं 5 नगरसेवकांचा स्वतंत्र गटाची विभागीय आयुक्तांकडे नोंद

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेत भाजपकडून 93 नागरसवेकांची आणि 5 स्वतंत्र आरपीआय नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेत आरपीआयचे स्वतंत्र अस्तित्व असणार असून त्यांचे गटनेतेपद सिद्धार्थ धेंडे यांना देण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि रिपाइंमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून 162 जागांपैकी 10 जागांवर रिपाइंचे उमेदवार हे भाजपच्या चिन्हावर उभे राहिले होते. त्यामुळे रामदास आठवले यांनी पुण्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. यामुळे उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली. या निवडणुकीमध्ये भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले. त्यामध्ये 5 नगरसेवक हे रिपाइं निवडून आले आहे.

रिपाइंच्या नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार आज विभागीय आयुक्तांकडे भाजप सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी 98 पैकी 93 नगरसेवकांची स्वतंत्र नोंद केली. तर आरपीआयकडून 5 नगरसेवकांचा स्वतंत्र गटाची नोंद करण्यात आल्याचे नगरसेवक सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले. तर ते पुढे म्हणाले की, आरपीआयला स्वतंत्र कार्यालय मिळणार असून नवनाथ कांबळे यांना उपमहापौरपद दिले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

या विषयी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले की, यंदाच्या पुणे महापालिकेत 98 नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यापैकी 5 नगरसेवक हे आरपीआयचे होते. त्या नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार आणि पालकमंत्र्याच्या आदेशानुसार त्यांच्या 5 नगरसेवकांचा स्वतंत्र गट करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

spot_img
Latest news
Related news