Crime News : इंटरव्ह्यूच्या बहाण्याने एकाची पावणेचार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – इंटरव्ह्यूच्या बहाण्याने बोलवून एकाचा मोबाईल घेऊन जाऊन पावणेचार लाख रुपयांची ऑनलाईन नेटबँकिंगद्वारे फसवणूक (Crime News) करण्यात आली आहे.याबाबत अमरेंद्र कुलकर्णी, (वय 54, रा. कोथरूड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचा शनिवारी अजित पवार यांच्या उपस्थित ‘कार्यकर्ता संवाद’

प्रवीण माथुर व एक हिरव्या रंगाचा टी शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेला तोंडाला मास्क लावलेला तरुण वय अंदाजे 25 ते 30 वर्ष रा पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही. या दोन आरोपींच्या विरोधात (Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहें.ही घटना 2 ऑगस्टला सकाळी 10 ते दुपारी 1.30 या दरम्यान धर्मशी माईलस्टोन बिल्डिंग, चांदणी चौकाजवळ बावधन येथे घडली होती.

फिर्यादी यांना बावधन येथे बंधन बँकेचे इंटरव्ह्यू घेण्याच्या बहाण्याने आरोपी माथुरने दुसऱ्या आरोपीस फिर्यादी सोबत मीटिंग करण्यासाठी पाठवले. त्या आरोपीने फिर्यादीचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल लबाडीने घेऊन गेला. दोघा आरोपींनी संगनमताने फिर्यादी यांच्या मोबाईलवरून नेटबँकिंगद्वारे एकूण 3.75 लाख रुपयांची फसवणूक करुन अपहार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.