Pune: खडकवासला धरणातून दुपारी २ वाजल्यापासून ५ हजार १३६ क्युसेकने विसर्ग : महापौर

5 thousand 136 cu-secs discharged from Khadakwasla dam from 2 pm: Mayor

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणातून आज दुपारी २ वाजल्यापासून ५ हजार १३६ क्युसेकने विसर्ग सुरु होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे 100 टक्के भरण्याच्या स्थितीत आहेत.

सध्या खडकवासला धरणात १.९७ टीएमसी (१००%), पानशेत १०.६५ टीएमसी (१००%), वरसगाव १२.५६ टीएमसी (९७.९७%), तर टेमघर धरणात ३.०४ टीएमसी (८२.११) असा चारही धरणांत एकूण २८.२३ टीएमसी म्हणजेच ९५.६८% पाणीसाठा आहे.

गेल्या वर्षी आजच्या दिवशी २८.९४ टीएमसी म्हणजेच ९९.४३ % पाणीसाठा होता. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत आता 95 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे.

त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच इंदापूर आणि दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचाही पाणीप्रश्न मिटला आहे.

धरणांत जोरदार पाऊस पडत असल्याने ही धरणे लवकरच 100 टक्के भरणार आहेत.

पुणेकरांना दर महिन्याला दीड टीएमसी पाणी लागते. वर्षाला जवळपास 18 टीएमसी पाणी लागते. त्यामुळे पुणेकरांना 2 वेळा चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होतो.

जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात ही कसर भरून काढली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.