Pune : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत केवळ 61 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा (Pune) करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव धरणांत केवळ 61 टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणी टंचाहीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. मागील वार्षी याच कालावधीत 72.62 टक्के पाणीसाठा होता. यंदा पावसाने दडी मारल्याने धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात ६१ टक्के पाणीसाठा तर सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

Pimpri : औद्योगिक क्रीडा संघटनेची साठावी फुटबॉल स्पर्धा

खडकवासला धरणात सध्या 1.19 अब्ज घनफूट (टीएमसी), पानशेतमध्ये 8.30 टीएमसी, वरसगावमध्ये 8.02 टीएमसी आणि टेमघरमध्ये 0.48 टीएमसी असा एकूण 17.99 टीएमसी पाणीसाठा खडकवासला प्रकल्पात आहे. म्हणजेच 61.77 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी जानेवारी अखेरीस खडकवासला धरण साखळीत 21.18 टीएमसी (72.62 टक्के) पाणीसाठा होता.

पिण्याच्या पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. कालवा समितीच्या बैठकीत जुलै अखेर पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. जलसंपदा विभाग धरणातील पाणीसाठ्यावर लक्ष ठेऊन आहे. त्यांनी आतापासूनच पुणे महापालिकेला पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.