Pimpri : औद्योगिक क्रीडा संघटनेची साठावी फुटबॉल स्पर्धा

एमपीसी न्यूज – औद्योगिक क्रीडा संघटनेच्या (Pimpri) साठाव्या फुटबॉल स्पर्धेस आज दि. 30 जानेवारी मंगळवारी,टाटा मोटर्सच्या क्रीडांगणावर प्रारंभ झाला. टाटा मोटर्सचे प्रवीण तांबे (एचआर मॅनेजर) यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रवीण तांबे म्हणाले की, खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे; जो शरीर व मन दोघांनाही तंदुरुस्त ठेवतो.याप्रसंगी प्राज इंडस्ट्रीजचे व्हाईस प्रेसिडेंट विजयकुमार रामचंद्रन, औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम, वसंत ठोंबरे उपस्थित होते.

या स्पर्धेत ॲटलास कोपको, फोरव्हीया, एसके एफ, प्राज इंडस्ट्रीज, सँडविक एशिया, थरमॅक्स, ॲमुनेशन फॅक्टरी, बजाज ऑटो वाळूज, टाटा मोटर्स “ए” व “बी”,थायसन कृप या संघांनी भाग घेतला.

Pune :भाजपचा पुण्यातील लोकसभेचा उमेदवार दिल्लीतून ठरणार

 

आज झालेल्या सामन्यांचे निकाल

1)एसकेएफ विरुद्ध प्राज इंडस्ट्रीज या सामन्यात एसकेएफ संघाने 3 विरुद्ध 1 गोलने सामना जिंकला. एसकेएफ कडून पिल्ले, फर्नांडिस व मिनू यांनी प्रत्येकी 1तर प्राजकडून आदित्यने 1 गोल केला.

2)फोरव्हीया विरुद्ध सँडविक एशिया या सामन्यात फोरविया (Pimpri) संघाने 4 विरुद्ध 3 गोलने हा सामना जिंकला. फोरवियाकडून प्रतीक ढोमे,रोनक देसाई,शिवम व श्रेयस यांनी प्रत्येकी 1 तर सँडविक एशिया कडून किरण, सुयोग सुतार व यश यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

3)ॲमुनेशन फॅक्टरी विरुद्ध बजाज ऑटो वाळुंज यात झालेल्या सामन्यात ॲमुनेशन फॅक्टरी संघ 5 विरुद्ध 4 गोलने विजयी झाला.

4)थरमॅक्स विरुद्ध एसकेएफ यात झालेल्या सामन्यात थरमॅक्स अथर्वने 7 मिनिटात केलेल्या गोलाच्या जोरावर थरमॅक्स 1 विरुद्ध 0 गोलने विजयी झाली.

5) टाटा मोटर्स “बी” विरुद्ध फोरव्हीया यात झालेल्या सामन्यात फोरव्हीया 4 विरुद्ध 2 गोलने विजयी झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.