Pune :भाजपचा पुण्यातील लोकसभेचा उमेदवार दिल्लीतून ठरणार

एमपीसी न्यूज – भाजपचा पुण्यातील लोकसभेचा उमेदवार केंद्रीय संसदीय (Pune)समिती निश्चित करेल, अशी माहिती शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.

पुणे लोकसभेसाठी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ, बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत आहे. 2014 सालापासून मोदी लाटेत पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी होत आहे.
लोकसभेसाठी कोण इच्छुक आहे, याची माहिती माध्यमांतूनच मिळत आहे.

PCMC : महापालिका रुग्णालयात ‘आयुष्मान भव’’ मोहिमेंतर्गत मोफत उपचार

उमेदवार कोण असेल हे केंद्रीय स्तरावरच निश्चित होणार आहे. (Pune)निवडणुकीची तयारी करणे अयोग्य नाही. उमेदवार कोण असेल हे लवकरच स्पष्ट होईल. प्रदेश पातळीवरून आदेश आल्यास निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पक्षाच्या पदाधिकाऱ्याला तिकीट मिळेल, असेही घाटे यांनी स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवरच आली आहे. मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि सुनील देवधर यांनी पुणे शहरात जोरदार कार्यक्रम करण्यास प्राधान्य दिले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक उमेदवाराने आपापल्या नेते मंडळींशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.