Pune : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या 6 जणांना अटक

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना काल (दि. 26) रात्री 2 च्या सुमारास रेल्वे आरक्षण केंद्र, शंकरशेठ रोडवर घडली.

नुर महम्मद मुस्तफा(वय 36 रा.मुंबई), शाहिद अहमंदअली खान (वय 37, रा. मुंबई), फकीर महमद अहमद हुसेन शेख (वय 35, रा. मुंबई), अब्दुल रहेमान शेख (वय 40, रा. पुणे), अकबर मिया शेख (वय 34, रा. नवी मुंबई) व इरफान इलियास
हुसेन (वय 36, रा. मुंबई) असे अटक करण्यात आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  या 6 आरोपींनी बेकायदेशीररित्या 2 लाख 25 हजार रुपये किंमतीची घातक शस्त्रे (सोटे, तलवारी इ.) आपल्या जवळ बाळगली होती. आपल्या साथीदारांची जमवाजमव करुन पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात दहशत निर्माण करून रात्रीच्या वेळी पोर्णिमा टॉवर जवळील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत ते आले असताना या 6 आरोपींनी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.