Pune : दिव्यांग अपत्य असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना देखील दोन वर्षांची बाल संगोपन रजा

एमपीसी न्यूज : दिव्यांग अपत्य असलेल्या महापालिका कर्मचा-यांना देखील दोन वर्षांची विशेष बाल संगोपन रजा देण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि.29 ) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यास देखील मान्यता देण्यात आली.

दिव्यांग व्यक्तींसाठी स्थापन केलेल्या राज्य समन्वय समितीची शिफारस विचारात घेऊन विकलांग अपत्य असून पत्नी नसलेल्या शासकीय पुरुष कर्मचा-याला संपूर्ण सेवेत 730 दिवसांच्या कमाल मर्यादेत विशेष बाल संगोपन रजा मंजूर करण्याला शासनाने मंजुरी दिली आहे.

त्याप्रमाणे पुणे महापालिकेच्या कर्मचा-यांना देखील ही रजा मंजूर करण्यात यावी असा प्रस्ताव बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. यामध्ये अंध, क्षीणदृष्टी, बरा झालेला कुष्ठरोग, श्रवण शक्तीतील दोष, चलन – वलन विकलांगता, मतिमंदता, मानसिक आजार असलेल्या दिव्यांग मुलांच्या पालकांना ही रजा मिळू शकणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.