Pune: महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्याचा मार्ग मोकळा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शासनाच्या ग्रेड पे आणि महापालिकेचा ग्रेड पे यामध्ये अडकलेला सातवा वेतन आयोग अखेर मंजूर झाला आहे. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर अंमलबजावणी सुरू होणार आहे. पालिकेतील सुमारे 17 हजार अधिकारी – कर्मचारी वर्गाला याचा लाभ होणार आहे.

सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा निर्णय 20 उपसूचनांसह माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय समितीने एकमताने घेतला आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

श्रीनाथ भिमाले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी  झालेल्या बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्यासह समितीतील सर्व पक्षीय सदस्य, युनियनचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केल्यावर वेतनावर महापालिकेला अतिरिक्त 500 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे, असे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.