डॉ. मरल यज़ारलू आणि पंकज त्रिवेदी दुचाकीवर पार करणार 7 खंड

 "राईड टू बी वन"  द्वारे 50 पेक्षा जास्त देशांना  देनार भेट

एमपीसी न्यूज – आज बहुसंख्य लोक दैनंदीन जीवनात रोज बाईक चालवतात, बाईक हा जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे, परंतु आंतरराष्ट्रीय सिमारेषा ओलांडून खुप सारे देश बाईकच्या माध्यमातुन फिरने ही  कल्पनाच दमछाक करणारी आहे. परंतु  बाईकर्सना ही जीवनातील खुप मोठी संधी वाटते. असेच बाईकवेडे डॉ. मरल यजारलू आणि पंकज त्रिवेदी हे "राईड टू बी वन" ह्या मोहीमे अंतर्गत  आपल्या प्रवासाची सुरवात 15 मार्च पासून करणार आहे. ज्यामध्ये हे राईडर्स  दिड वर्षामध्ये दुचाकीवरती 50 पेक्षा जास्त देशांना भेट देतील. डॉ, मरल यज़ारलू आणि पंकज त्रिवेदी यांचा हा दुचाकीवर सात खंडाना गवसनी घालण्याचा प्रयत्न खुप साहसी आहे. ह्या अभियानासाठी पंचशील  रियल्टी  प्रायोजक आसतील.


इराणमध्ये जन्मलेली डॉ.मरल भारताला आपले घर समजते. मरल लहाणपणापासूनच शैक्षणिक, क्रिडा, काला अश्या विविध क्षेत्रांमध्ये पारंगत आहे. मार्केटींग मध्ये पीएचडी  केलेल्या मरलची कॉर्पोरेट कारकीर्द देखील खुप यशस्वी आहे. भारतातील अग्रगण्य पंचशील रियल्टी डेवलपर मध्ये ती मार्केटींग प्रमुख आहे. याचबरोबर तीने भारत आणि इराण मध्ये आपले 5 सिरेमिक, कैनवास 5 पेंटींग प्रदर्शन केले होते.प्रवास आणि दुचाकीची आवड आसणार्या मरल ने अत्तापर्यंत जवळ-जवळ 67 देशांना भेट दिली आहे. इटली ते आल्प्सचा बाईक प्रवास  तीने एकटीने पार केला. तीला क्विन ऑफ सुपरबाईक म्हणता येऊ शकते. भारतामध्ये तीला लेडी रायडर्सचा पहील महिला सूपरबाईक क्लब भेटला. ड्युकाटी आणि बीएमडब्ल्यू  असलेली ती पहीली भारतीय महिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.