अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे दिलीप कांबळे यांचा निषेध

एमपीसी न्यूज – सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारी (दि. 14) गणेश कला क्रीडा मंदिरा शेजारी, नेहरू स्टेडियम येथे, दिलीप कांबळे यांच्या कार्यालया समोर ‘जोडे मारो आंदोलन’  करण्यात येणार आहे. 

लातूर येथे एका कार्यक्रमात बोलताना " राज्यातील दलाली बंद झाल्याने काही लोक सरकारची बदनामी करण्यासाठी आंदोलन करत आहेत, पण अशा लोकांना घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का?" असे बेताल वक्तव्य केले होते. याचा निषेध म्हणून मंगळवारी आंदोलन केले जाणार आहे. 

त्यामुळे या आंदेलनाला समाज बांधवांनी मोठ्या प्रमाण उपस्थित रहावे, असे आवाहन महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.