Pune : बॉम्ब डिस्पोजलसाठी पुणे पोलिसांच्या सेवेत दक्ष रोबोट दाखल

एमपीसी न्यूज – डीआरडीओ (डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑरगनायझेशन) चे नवीन आरओव्ही-दक्ष ही एक रिमोटवर चालणारी यंत्रणा असून पुढील सहा महिन्यांसाठी ती पुणे पोलिसांसोबत पुणे शहराच्या सेवेत असणार आहे.

आरओव्ही-दक्ष हे भारतीय सेनेसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेने डिझाइन आणि विकसित केले आहे. आरओव्ही दक्ष सर्व प्रकारच्या घातक वस्तू सुरक्षितपणे शोधू, हाताळू आणि नष्ट करू शकते तसेच ते पाय-या देखील चढू शकते आणि खडबडीत अडथळा देखील पार करू शकते. दक्षच्या घट्ट रबरी चाके प्रभावी स्फोटकांना तोंड देऊ शकतात. एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ही यंत्रणा तीन तास सतत चालते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.