Pimpri: पदाधिकाऱ्यांचा दिल्ली दौ-यांवर सव्वा लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी, शिक्षण समितीचे सदस्य आणि अधिका-यांच्या दिल्ली दौ-यावर सव्वालाख रुपयांचा खर्च झाला आहे. खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. पदाधिका-यांनी दिल्लीतील शाळा पाहण्यासाठी दौरा केला होता.

दिल्लीतील आदर्श शाळा व तेथील आदर्श रुग्णालय पाहण्यासाठी महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, शिक्षण समितीच्या सभापती व  मनसे, अपक्षांचे गटनेते व शिक्षण समितीचे इतर सदस्य व अधिकारी असे 22 सदस्यांचे शिष्टमंडळ 8 व 9 ऑक्‍टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत दिल्ली दौ-यावर गेले होते. दिल्लीतील शाळांची पाहणी केली. त्यांच्या या दोन दिवसीय दौ-याला एक लाख 18 हजार 114 रुपयांचा खर्च आला आहे. या खर्चाला थेट पद्धतीने मान्यता देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.