Chinchwad: सायन्स पार्कमध्ये ‘फटाके व आरोग्यावरील दुष्परिणाम’ वर व्याख्यान

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व मराठी विज्ञान परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड, सायन्स पार्क येथील सभागृहात येत्या शनिवारी (दि.3) ‘फटाके व आरोग्यावरील दुष्परिणाम’ विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच शास्त्रीय गायनाचा देखील कार्यक्रम होणार आहे.

महापालिकेच्या चिंचवड येथील सायन्स पार्क प्रेक्षागृहात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यान होणार आहे. ‘फटाके व आरोग्यावरील दुष्परिणाम’ विषयावर मराठी विज्ञान परिषद पुणेचे कार्याध्यक्ष विनय र. र. हे व्याख्यान देणार आहेत.

व्याख्यानानंतर सायंकाळी साडेसहा वाजता पिंपरी-चिंचवड महापालिका प्रोत्साहित संगीत संध्या कार्यक्रम होणार आहे. याअंतर्गत पुण्याचे कुणाल वाईकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे, अशी माहिती सायन्स पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी मदनमोहन साळवे यांनी दिली. प्रवेश सर्वांना विनामूल्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.