Pune : भरदिवसा दुचाकीस्वाराची पावणेपाच लाखांची रोकड पळवली

एमपीसी न्यूज – बँकेत भरण्यासाठी रोकड घेऊन निघालेल्या दुचाकीस्वाराला अडवून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरटयांनी गाडीला अडकवलेली पावणेपाच लाख रुपये असलेली बॅग पळवून नेली. ही घटना मंगळवारी (दि.6) सकाळी साडेअकराच्या सुमारास मार्केटयार्ड येथील भूराणी कॉलनी जवळ घडली.

या प्रकरणी शेख अहम्मद हुसेन (वय 64) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हे आपल्याअॅक्टीव्हा गाडीवर सकाळी साडेअकराच्या दरम्यान गंगाधाम चौकातील पेट्रोल
पंपावरून मार्केटयार्ड येथील स्टेट बॅंकमध्ये भरणा करण्यासाठी पावणे पाच लाखांची रोकड घेऊन जात होते. शेख यांनी ती रोकड अॅक्टीव्हा गाडीच्या पुढील बाजूस बॅगमध्ये ठेवली होती.

दरम्यान ते भूरानी कॉलनी येथे आले असता पाठीमागून त्यांच्याजवळ दोघेजण मोटारसायकलवरून आले. त्यातील एकाने शेख यांना ‘तुम्हाला गाडी व्यवस्थित चालवता येत नाही का ?’ असे विचारून त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. दरम्यान दुसऱ्या चोरट्याने पैशांची बॅग लंपास करून दोघेही पसार झाले. पुढील तपास मार्केटयार्ड पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.