बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

गुन्हा दाखल असलेले 214 उमेदवार पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुकीच्या रिंगणात

 तर शहरात  88 केंद्र व 373 मतदान बूथ संवेदनशील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत यावर्षी  774 उमेदवारांपैकी 214 उमेदवारांवर वेगवेगळ्या स्वरुपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. तर  443 केंद्रापैकी 88 मतदानकेंद्रेही संवेदनशील आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी आज (शुक्रवारी) परिषदेत दिली.


कासारवाडी येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस पोलीस उपाआयुक्त गणेश शिंदे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे,पिंपरी विभागाचे सहायक पोलीस उपायुक्त राम मांडूरके, चतुःश्रृंगी विभागाच्या  सहायक पोलीस उपायुक्त  वैशाली जाधव, महापालिका अतिरीक्त आयुक्त तानाजी शिंदे, निवडणूक सहायक आयुक्त यशवंत माने, सहायक आयुक्त आण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, यावेळी  संवेदनशील असा कोणताही एक प्रभाग नसून 32 प्रभागातील एकूण 443 केंद्रापैकी 88 मतदान केंद्रे व त्या मतदान केंद्रातील 1 हजार 510 बूथ पैकी 373 बूथ हे संवेदनशील आहेत. यामध्ये  5 पेक्षा जास्त बूथ असणारी मतदानकेंद्रे आहेत जिथे विशेष अधिकारी नेमले गेले आहेत.  या ठिकाणी उभारलेले मतदार, त्यांच्या कार्यकर्त्यांची पार्श्वभूमी, मतदारवर्ग यासा-या गोष्टींचा विचार करुन कायदा व सुव्यवस्थेसाठी आम्ही  ही केंद्रे निवडली आहेत. 

या काळात सुमारे अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे.  अगदी 5 ते 7 मिनिटात आमची यंत्रणा तक्रारीच्या ठिकाणी पोहचेल अशी आमची तयारी आहे. तसेच आचारसंहितेच्या काळात आज अखेर 270 पैकी 260 जणांनी त्यांची हत्यारे जप्त झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

spot_img
Latest news
Related news