pimpri : विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेतर्फे अखंड हरीनाम सप्ताह व गाथा भजन सोहळ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज –  पिंपळे सौदागर येथील विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेतर्फे आयोजित सुवर्ण महोत्सव काकड आरती सप्ताह निमित्त अखंड हरीनाम सप्ताह व गाथा भजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी  आळंदी-पंढरपूर वारीचे वंशपरंपरागत चोपदार हभप डॉ. बाळासाहेब चोपदार, ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव, महंत पुरषोत्तम महाराज पाटील ( आळंदीकर ) नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शितल नाना काटे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन तसेच गाथा पूजन व विणापुजन करून सप्ताह सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.यावेळी आळंदी-पंढरपूर वारीचे वंशपरंपरागत चोपदार ह.भ.प. डॉ. श्री. बाळासाहेब चोपदार, ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव, महंत पुरषोत्तम महाराज पाटील( आळंदीकर ) यांचा यावेळी नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे व पिंपळे वारकरी संस्थेचे अध्यक्ष संदेश काटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी  विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेचे आजी माजी पदाधिकारी  तसेच शिवशंभो सेवा मंडळाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व  गावकरी उपस्थित होते. २४ नोव्हेंबर ते रविवार १ डिसेंबर दरम्यान सोहळा होणार आहे.यामध्ये विविध नामवंत किर्तनकारांचे कीर्तन तसेच विविध महिला भजनी मंडळातर्फे भजन कार्यक्रम होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.