मोबाईल शॉपी फोडणारे सराईत गुन्हेगार जेरबंद;78 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज – मुंढव्यातील मोबाईल शॉपी फोडून आत प्रवेश करत हजारोचा ऐवज चोरून नेणा-या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या कर्मचा-यांनी जेरबंद केले. यावेळी त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या मोबाईलसह कम्प्यूटर एलसीडी स्क्रिन, रिचार्ज व्हॉउचर, असा एकूण 77 हजार 954 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

याप्रकरणी सराईत गुन्हेगार अमोल बाळासाहेब आडेगावकर (वय-23, रा.पाटकुल,ता.मोहोळ. जी.सोलापूर) याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल आडेगावकर हा एका हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. याप्रकरणी त्याला तुरुंगवास झाला असून मागील सात महिन्यापासून तो जामीनावर बाहेर आहे. तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदारावरही चोरीचा गुन्हा दाखल आहे.

आरोपी ससाणेनगर जवळील डीमार्ट परिसरात चोरीचे मोबाईल घेऊन थांबले असता पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांचे 27 मोबाईल हस्तगत करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.