Dehuroad : गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

एमपीसी न्यूज – गुन्हेगारावर वचक रहावा यासाठी पोलिसांनी देहुरोड परिसरामध्ये गुरुवारी पहाटे कोम्बींग ऑपरेशन केले. या कोम्बींग ऑपरेशनमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 आणि 2, खंडणी विरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि देहूरोड पोलिस स्टेशनचे कर्मचारी असे एकूण 200 पोलीस सहभागी झाले होते. यावेळी 33 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आज (गुरुवारी) पहाटे देहूरोडमधील गांधीनगर आणि आंबेडकर नगर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केले. यावेळी परिसरातील रेकॉर्डवरील 52 सराईत गुन्हेगारांपैकी 33 जण मिळून आले. या गुन्हेगारांची चौकशी करण्यात येणार असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान काही गुन्हेगारांनी देहूरोड परिसरातून पळ काढला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.