Bhosari : भोसरीत भाजप नगरसेवकांचा आमदार कार्यालयापुढे जल्लोष

मराठा समाजाला आरक्षण

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्वासन भाजप सरकारने पाळले आहे. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याबाबतचे विधेयक आज विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानिमित्त भाजपच्या नगरसेवकांनी भोसरीत जल्लोष केला.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालया समोर आंनदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक लक्ष्मण सस्ते, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, अॅड. नितीन लांडगे, वसंत बोराटे, कुंदन गायकवाड, संजय नेवाळे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे,  नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, साधना  मळेकर, अश्विनी जाधव, सारीका सस्ते, सुवर्णा बुर्डे, हिराबाई घुले, निर्मला गायकवाड,  प्रा. सोनाली गव्हाणे , भिमाबाई फुगे,  नम्रता लोंढे, साधना तापकीर, विजय फुगे, दत्ता परांडे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, स्वीकृत सदस्य दिनेश यादव, विजय लांडे, सागर हिंगणे, संतोष मोरे, पांडुरंग भालेकर, अजित बुर्डे, पांडुरंग गवळी, उमेश घाडगे, संतोष लांडगे, अमित भिंताडे, महेश मरे, दिनेश पठारे, सचिन शिंदे, अजित सस्ते, नितीन साबळे, जितेंद्र यादव, परांडे मामा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ”भाजप सरकारने मराठा समाजला आरक्षण देण्याचा शब्द पाळला आहे. सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले आहे. अभ्यासपुर्वक आरक्षण दिले आहे. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात देखील हे आरक्षण टिकणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी वारंवार आवाज उठविला. विधानसभेत सरकारकडे विचारणा केली होती. इतर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सर्व घटकाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. धनगर समाजाला देखील लवकरच आरक्षण मिळेल”.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले. त्यामुळे सर्वच समाजातील नागरिक आनंदी आहेत. मराठा, माळी, मुस्लीम सर्व समाजातील नागरिक जल्लोषात सहभागी झाले होते. त्यामुळे एकीचे दर्शन घडले. ‘ तुमचं, आमच नात काय, जय भवानी, जय शिवराय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘भाजप सरकारचा विजय असो’, ‘नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.