Pune : सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे : अजित पवार

एमपीसी न्यूज – सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात टिकणारे (Pune)मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. पण, ते देताना अन्य कोणत्याही समाज घटकाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक आणि महात्मा फुले वाडा तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासंदर्भात अजित पवार यांनी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा सभेवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना(Pune) तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र ते न्यायालयात टिकले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करून दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले. पण, सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नाही. त्यामुळे टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ दिला पाहिजे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शेतकरी प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. पण, ही भेट लांबणीवर पडली आहे.
सध्या अमित शहा राज्यसभा आणि लोकसभेच्या कामकाजात बिझी आहेत. त्यांचे काम झाले की भेटणार आहोत, असेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.