Pune: एमजे चषक तिसरी निमंत्रित हॉकी स्पर्धा ;पुरुष गटात क्रीडा प्रबोधिनीचे वर्चस्व तर महिला गटात पीसीएमसी अकादमी अव्वल

एमपीसी न्यूज -क्रीडा प्रबोधिनी संघाने जीएसटी कस्टम (Pune)संघावर 3-0 अशी मात केली आणि एमजे चषक तिसऱ्या निमंत्रित हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. महिलांच्या गटात मात्र पीसीएमसी अकादमी संघाने क्रीडा प्रबोधिनी संघाला 5-2 असे पराभूत केले आणि अजिंक्य पदावर नाव कोरले.

ही स्पर्धा नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर धनराज पिल्ले फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हॉकी महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली आणि एक्सलन्सी हॉकी अकादमीने आयोजित केली होती.

पुरुष गटात विजेतेपद मिळविणाऱ्या क्रीडा प्रबोधिनी संघाला सात हजार रुपयांचे तर उपविजेत्या जीएसटी संघाला सहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या मध्य रेल्वे संघाला पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.

Pimpri :आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपाच ‘अजेय’- शंकर जगताप
महिला विभागातील विजेत्या पीसीएमसी अकादमीने पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळविले तर उपविजेत्या क्रीडा प्रबोधिनीला चार हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या मुंबई रिपब्लिकन्सला तीन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

दिवंगत संघटक मोती जॉन यांच्या पत्नी मारिया सबरीना, हॉकी महाराष्ट्र समिती सदस्य जॅसिंटा जाधव,आणि सदस्य डोरोथी एझेकील यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

निकाल


पुरुष, अंतिम: क्रीडा प्रबोधिनी: ३ (सचिन कोळेकर १५वे; धैर्यशील जाधव ४९वे; विनायक हांडे ५५वे) वि.वि.जीएसटी आणि सीमाशुल्क पुणे: ०.
तिसरे स्थान: मध्य रेल्वे पुणे: ४ (श्रेयश डी २७वे व, ३५वे; रुबेन केदारी ५४वे ; युवराज वाल्मिकी ५७वे) वि.वि पीसीएमसी: ३ (जय काळे ४१वे; हर्षदीप सिंग ५५वे ; विक्रम पिल्ले ६वे).
महिला, अंतिम: पीसीएमसी अकादमी: ५ (अन्वी रावत ११वे., २५वे, शायना मुलाणी २०वे; सानिका माने ४२वे, ६०वे ) वि.वि क्रीडा प्रबोधिनी: २(सुकन्या धनावरे ३४वे, ४०वे).
तिसरे स्थान: मुंबई रिपब्लिकन: २ (करिश्मा महतो ४१ वे; झानेटा क्वाड्रोस) वि.वि एक्सलन्स हॉकी अकादमी: १(सिद्धी गवळी ३रे – p.c).

वैयक्तिक बक्षिसे

पुरुष : सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : प्रतीक सोळंकी (मध्य रेल्वे पुणे)
सर्वोत्कृष्ट बचावपटू : मयूर धनावडे (क्रीडा प्रबोधिनी)
सर्वोत्कृष्ट मध्य रक्षक : सचिन कोळेकर (क्रीडा प्रबोधिनी)
सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड: स्टीफन स्वामी (जीएसटी आणि कस्टम पुणे)
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू: सतीश पाटील (जीएसटी आणि कस्टम पुणे)
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू: धैर्यशील (क्रीडा प्रबोधिनी)
सर्वाधिक गोल-स्कोअरर: चिराग माने (इन्कम टॅक्स पुणे; ७ गोल)

महिला
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक: आकांशा सुद्रिक (एक्सलन्सी हॉकी अकादमी)
सर्वोत्कृष्ट बचावपटू : समिक्षा पाटील (एक्सलन्सी हॉकी अकादमी)
सर्वोत्कृष्ट मध्य रक्षक: शालिनी साकुरे (पीसीएमसी)
सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड: अभिता एस. (एक्सलन्सी हॉकी अकादमी)
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू: दुर्गा शिंदे (पीसीएमसी)
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू: झानेटा क्वाड्रोस (मुंबई रिपब्लिकन)
सर्वाधिक गोल-स्कोअरर: सानिका माने (पीसीएमसी ६ गोल)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.