Alandi : गोर गरीब मराठ्यांच्या मुलांचे कल्याण व्हावे यासाठी हा संघर्ष – मनोज जरांगे पाटील

एमपीसी न्यूज – आळंदी येथे काल दि.6 रोजी मनोज जरांगे पाटील यांचे (Alandi ) फटाक्याच्या अतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. तसेच त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान हजेरी मारुती मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.आळंदी ग्रामस्थांतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.  तसेच नगरपालिका चौक शिवस्मारक येथे सकल मराठा समाज बांधव आळंदी सर्कल यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.शिवस्मरकाच्या येथे मिरवणुकीची सांगता झाली.

त्या ठिकाणी त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले , ज्यांना ज्यांना वाटत होते मराठा ओबीसी आरक्षणात गेला नाही पाहिजे. ते कोणाकडे ही बोलायला लागले आहे. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी करोडोच्या संख्येने मराठ्यांची मुले मुबंईला गेली. जो मराठा आरक्षणासाठी कायदा लागतो. तो राज्यात सापडला आहे. त्यासाठी सगेसोयरे कायदा पारित करायचा होता. विधानसभा सुरू नसल्याने  अगोदरच राजपत्र सूचना काढली. त्याचे जाहीर प्रकटन दिले.

जर त्या कायद्यात दुरुस्ती करायची असेल ते राजपत्र काढण्या शिवाय पर्याय नाही. आता मराठ्यांना ओबीसी त आरक्षण पाहिजे असेल तर नोंदी नसताना पाहिजे असेल तर नोंदी मिळालेल्या आधारावरती सगेसोयऱ्या ना (महाराष्ट्राच्या )पाहिजे असेल तर 2001 च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागते.ती जर करावयाची असेल तर विधान सभेत करावी लागते. सध्या विधान सभा सुरू नाही.यामुळे अधिसूचना काढली. त्यामध्ये 15 दिवसाच्या  हरकती मागितल्या आहे.येत्या 15 तारखेला सगेसोयरे अध्यादेश निघाला.  त्या अध्यादेशाचे रूपांतर 15 तारखेला   कायद्यात होणार आहे.

Today’s Horoscope 07 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

15 तारखे नंतर लगेच अंमलबजावणी करणार आहेत.ही पहिली घटना आहे .मराठे करोडो च्या संख्येने एकत्र आले. 2001 च्या कायद्यात दुरुस्ती करून सगेसोयरे हा कायदा पारित केला आहे. हा कायदा खूप मोठा आहे मराठ्यांनी समजून घेण्याचे गरजेचे आहे.हा कायदा लहान असता तर टोळ्या आपल्या विरोधात याचिका करायला उतरल्या नसत्या.2001 च्या कायद्याला आव्हान करता येत नाही. त्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार सरकारचा आहे. गोर गरीब मराठ्यांच्या मुलांचे कल्याण व्हावे यासाठी हा संघर्ष सुरू आहे.अजूनही मागे हलो नाही.काही जण म्हणतात मुंबईला गेले आणि काय मिळाले? तुला काय माहित काय मिळालेच,  असे उत्तर विरोधकांना त्यांनी यावेळी दिले.

तसेच ते पुढे म्हणाले मराठ्यांनी सांगितले होते शांततेत  जाणार व शांततेत येणार. येताना आरक्षण घेऊन येणार. हे कायद्याचे राज्य आहे. तुम्हाला कायम टिकवायचे असेल तर कायद्यात बदल करावा लागणार आहे. मराठी पोरांनी तो वेशीवरच केला. वेशिवरच मराठ्यांना राजपत्र अध्यादेश देऊन  आरक्षण द्यावे लागले. आता फक्त अंमलबजावणी बाकी आहे. ते घेतल्या शिवाय हलणार नाही. ते घेण्यासाठी 10 तारखेला परत पुन्हा आमरण उपोषणास उभा राहील.

काहीच नाही मिळाले असं कोण म्हणत असेल तर 57 लाख नोंदी  मिळाल्या आहेत. 39 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र वाटप झाले आहेत. धाराशिव मधील एकाची नोंद सापडली. त्या नोंदी मुळे 140 जणांना प्रमाणपत्र भेटली. माझे जीवन समाजासाठी अर्पण केले आहे. या समाजाला मायबाप मानले. त्या समाजाशी गद्दारी  करणार नाही. येथून मागे काही लढलो व येथून पुढे ही जे काही लढणार आहे ते समाजासाठीच लढणार आहे. हे आरक्षण भेटल्यावर क्लास वन आधिकारी पहायचे आहे . त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायचा आहे.

मराठा बांधव व ओबीसी बांधव गावोगावी आता पण प्रेमाने वागत आहेत. एकमेकांच्या सुख दुःखात एकत्र असतात. तर त्यांच्या मध्ये कशाला वाद निर्माण करत आहात ? असा सवाल उपस्थित केला.  तसेच नाभिक समाजा बाबत छगन भुजबळांनी वादग्रस्त वक्तव्य केले त्याचा समाचार यावेळी मनोज जरांगे यांनी घेतला.

तसेच ते पुढे म्हणाले 15 वर्षा पूर्वी हे आरक्षण मिळाले असते तर जगाच्या पाठीवर प्रगत जात देशात,जगात एक नंबरला असती. गोर गरिबांच्या लेकरांचे कल्याण झाले पाहिजे. यासाठी हा संघर्ष करत आहे.आता फक्त आरक्षणाची अंमलबजावणी बाकी आहे. 15 तारखेला अधिवेशन बोलवले आहे.

आळंदी नगरीतून महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना , महाराष्ट्रातील सर्व पक्षातील आमदारांना मंत्र्यांना सुध्दा आवाहन करत आहे,  15 ला जे अधिवेशन होणार आहे,त्यात हा कायदा मंजूर व्हावा यासाठी मराठ्यांच्या बाजूने आवाज उठवावा . प्रत्येक मतदार संघातील आमदारांना फोन करा व पत्राने लिहा. येत्या 15 तारखेच्या अधिवेशनात जो सगेसोयरे कायदा आहे पारित होणार आहे,त्याच्या अंमलबजावणीसाठी सगळ्यांनी एकमताने आवाज उठवावा .  सभा संपल्यानंतर माऊलीं मंदिरात त्यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे (Alandi ) दर्शन घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.