Today’s Horoscope 07 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 07 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – बुधवार.

तारीख – 07.02.2024.

शुभाशुभ विचार – 14 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष – प्रदोष.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – पूर्वाशाढा .

चंद्र राशी – धनु.

—————————–

मेष – ( शुभ रंग – मरून)

पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. घरात आज थोरमंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती होईल.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

आज दिवसाचा पूर्वार्ध मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी तितकासा अनुकूल नाही. दुपारनंतर कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल. घरात वडीलधाऱ्यांची मने जपावी लागतील.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता)

महत्त्वाची सर्व कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. दुपारनंतर दिवस तितकासा अनुकूल नाही. नवीन ओळखीत फक्त राम राम करा. कोणताही व्यवहार नको.

कर्क – ( शुभ रंग – मोतिया)

धंद्यातील येणी वसूल होतील. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगलीच जमेल. वैवाहिक जीवनात आज दुपारनंतर सुसंवाद घडेल.

सिंह -( शुभ रंग – आकाशी)

आज चैनी व विलासी वृत्ती बाळा. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. संध्याकाळी मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

कन्या – ( शुभ रंग- डाळिंबी)

मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. प्रेमी युगुलांमध्ये वादविवाद संभवतात.

तूळ – ( शुभ रंग- जांभळा)

आज काम कमी व दगदगच जास्त होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा आज वादाला कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल.

वृश्चिक – ( शुभ रंग – आकाशी)

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात जुळलेले नवे हितसंबंध भविष्यकाळाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.

धनु – (शुभ रंग- चंदेरी)

क्षुल्लक कारणांवरून शेजऱ्यांशी मताभेदाची शक्यता आहे. आज गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्यावा. आवक पुरेशी असली तरीही बचतीला प्राधान्य देणे हिताचे आहे.

मकर – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमची तब्येत थोडीशी नरमच असेल. क्षूल्लक गोष्ट फार मनाला लावून घ्याल. मोफत सल्लागार मंडळींचे सल्ले फार मनावर घेऊ नका. आज जशास तसे या धोरणाने वागा.

कुंभ – (शुभ रंग- गुलाबी)

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या तुमच्या काही अपुऱ्या इच्छा पूर्ण होतील. वाहन वास्तू खरेदी मधील अडथळे दूर होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल.

मीन – ( शुभ रंग- मोरपंखी)

उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. हाताखालचे लोक नम्रतेने वागतील. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.