Chinchwad : विनायक थोरात हे भारताच्या इतिहासातील सातवे सुवर्ण पान लिहिणारे अदृश्य शिलेदार – भय्याजी जोशी

एमपीसी न्यूज- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारताच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने (Chinchwad) शोधून काढली होती, म्हणजेच सहा सोनेरी कलखंड त्यांनी शोधून काढले होते, मात्र भारताच्या इतिहासातील सातवे सुवर्ण पान लिहिणारे म्हणजेच अयोध्येतील राममंदिर उभारणारे अदृश्य शिलेदार ज्येष्ठ संघकर्मी विनायक थोरात हे आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य भय्याजी जोशी यांनी केले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात ज्येष्ठ संघकर्मी विनायक थोरात यांच्या 75 व्या वाढिवसानिमित्त अभिष्टीचिंतन सोहळा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नाना जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व थोरात कुटुंबीय उपस्थित होते.

देशाच्या इतिहासातील 7 वे सुवर्ण पान लिहित असताना या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य तुम्हा आम्हा सर्वांना लाभले आहे, असे अयोध्येतील राममंदिर उभाणीच्या कार्याला उद्देशून जोशी म्हणाले. हे जे राष्ट्र मंदिर उभे राहते आहे, त्यामध्ये असे असंख्य लोकं आहेत जे कदाचित समाजाला दिसणार नाहीत त्यांच्यापैकी विनायक थोरात हे आहेत, असेही जोशी म्हणाले.

देश, समाज बदलण्यासाठी ज्यांनी भूमिका बजावली त्यांचे विनायक थोरात प्रतिनिधि आहेत. लहान वयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला आणि सुमारे पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ ज्यांनी संघासाठी योगदान दिलं, संघ परिवार वाढीसाठी विनायक थोरात यांनी आयुष्य वेचलं,या कालावधीत एकदाही संघातून बाहेर जावे, असे त्यांना वाटले नाही असेही भय्याजी जोशी यांनी सांगितले.

Pune :अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ते पुढे नेतील -चंद्रशेखर बावनकुळे

कौटंबिक जबादारी सांभाळून संघाचे काम त्यांनी केले. कोणतीही प्रसिद्धीची हाव त्यांना नव्हती. मित्र म्हणून विनायक थोरात सर्वांना परिचित आहेत. संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे होत आहेत, अनेक लोक असे विचारतात की, संघाची उपलब्धी काय आहे? तर विनायक थोरात यांच्या सारखे अनेक लोकं संघाने ऊभे केले, हीच संघाची उपलब्धि आहे असे आम्ही सांगतो. निस्वार्थ भावनेनं विनायक थोरात यांनी स्वतःला संघासाठी झोकून दिले.

विनायकरावांनी जेंव्हा संघाची प्रतिज्ञा घेतली तेंव्हापासून त्यांनी संघाची शिस्त आणि अनुशासन याचा जीवनभर अवलंब केला. त्यांनी आजीवन त्या वृताचं पालन केले. मनापासून कार्य करणाऱ्यांना कोणत्याही ओपचारिक प्रतिज्ञेची गरज नसते. विनायकरावांनी प्रतिज्ञा मनामध्ये ठेऊन, तो भाव मनामध्ये ठेऊन जीवनाची वाटचाल केली. त्यामुळे ते खरे मार्गदर्शक आणि प्रेरक आहेत, असेही जोशी म्हणाले.

सामजिक जीवनामध्ये आणि संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये मार्गदर्शक व प्रेरक (Chinchwad) कोण आहेत तर ती विनायक थोरात यांच्यासारखी सच्चे व निष्ठावान स्वयंसेवक आहेत. असे अनेक स्वयंसेवक संघाने निर्माण केले आहेत. विनायक थोरात यांचा अमृत महोत्सव हा देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळात होतो आहे, हे केवळ योगायोग नसून आपल्या सर्वांचं भाग्य आहे असेही ते म्हणाले.

हजारो वर्षाच्या कालावधीनंर देशात बदल घडतो आहे. जे रामभक्त सुमारे पाचशे वर्ष मंदिरासाठी लढले, तेच पुन्हा पुनर्जन्म घेऊन 22 जानेवारीच्या प्राण्रतिष्ठापना सोहळ्याचे साक्षीदार झाले अशी माझी श्रध्दा असल्याचेही त्यांनी सांगितले. अपल्या देशात मंदिरांची कमी नाही, पण अयोध्या येथील राम मंदिर हे राष्ट्र मंदिर आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.