Wakad : ऑनलाईन पैसे देण्याची बतावणी करत सराफाची अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतो अशी बतावणी करत दागिने खरेदी करून सराफाची अडीच लाखांची फसवणूक केली. ही घटना कस्पटे वस्ती वाकड येथे घडली.

विश्वनाथ बाजीराव पाटणकर (वय 53, रा. फॉर्च्युन बिजनेस सेंटर, कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शेखर देवरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणकर यांचे फॉर्च्युन बिजनेस सेंटर येथे सराफी दुकान आहे. 17 फेब्रुवारी 2018 रोजी आरोपी देवरे हा त्यांच्या दुकानात आला. 2 लाख 32 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले. तसेच त्यांचा विश्वास संपादन करून दागिन्यांचे पैसे आरटीजीएस द्वारे हस्तांतरित करतो असे सांगून दागिने घेऊन गेला. त्यानंतर पाटणकर यांनी देवरेला दागिन्यांचे पैसे मागितले असता “मी तुमचे पैसे दिले आहेत, माझ्यासमोर येऊ नका, रोडवर फिरणे मुश्किल होईल” अशी धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.