Pune : 33 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत इथिओपियाच्या खेळाडूच वर्चस्व

फुल मॅरेथॉनमध्ये अटलाव डेबेड विजेता

एमपीसी न्यूज – पुण्यात दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पाहिल्या रविवारी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेचे 33 वे वर्ष असून देश विदेशातून या स्पर्धेत सहभागी झाले होते. तर दरवर्षी प्रमाणे यंदा देखील पुणे मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या खेळाडूच वर्चस्व पाहण्यास मिळाले असून फुल मॅरेथॉनमध्ये अटलाव डेबेड विजेता ठरला आहे.

33 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला सारसबागे जवळील बाबुराव सणस मैदानापासून सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते सुरुवात झाली.यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, परलिम्पिकमध्ये पाहिले सुवर्णपदक जिकणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर, मिलिटरी इंटेलिजन्स स्कुल कममंडट लेफ्टनंट जनरल आर के बन्सीवाल उपस्थित होते. तर यामध्ये एकूण 15 हजार स्पर्धक सहभागी झाले असून 102 परदेशी स्पर्धकांचाही समावेश आहे. विविध किलोमीटरसाठी ही स्पर्धा अयोजित करण्यात आली आहे. फुल मॅरेथॉन 42 किलोमिटरची, हाफ किलोमीटर 21 किलोमीटरची, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, व्हील चेअर अशा विविध गटामध्ये स्पर्धा पार पडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.