Kanhe : मावळ तालुका निवेदक संघटनेच्या अध्यक्षपदी अतुल सातकर

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील निवेदक संघटनेची आज (रविवारी) साईबाबा सेवाधाम कान्हे येथे बैठक झाली. या बैठकीत तालुक्यातील सर्व निवेदकांच्या उपस्थित मावळ तालुका निवेदक संघटनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी अतुल प्रकाश सातकर, सचिव अॅड. मोहन बधाले तर कार्याध्यक्ष म्हणून सुभाष भानुसघरे, रमेश जाचक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवेदकांना मानाचे स्थान मिळावे, निवेदकांचा राजकीय पदाधिका-यांकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, निवेदकांचा मध्यस्थी समवेत सन्मान करावा, आयोजकांनी जावई सन्मान व वधुराणीला ओवाळणी साठी सौभाग्यवतीची नावे व लग्नाच्या वेळी स्वागत व आशीर्वाद यांची नाव देण्याचा अधिकार वर व वधू पालकांना आहे त्यास निवेदकांना जबाबदार ठरवू नये यासाठी ही संघटना काम करणार आहे. 

एखाद्या मान्यवरांचे व व्यक्तीचे नाव चुकून घ्यायचे राहिले तर त्यास निवेदकांना जबाबदार धरू नये. निवेदकांना शिवीगाळ तसेच मारहाण किंवा दमदाटी दादागिरी सारख्या घटना घडत असेल तर यापुढे असे प्रकार झाल्यास तालुक्यातील लग्नावर निवेदकांसह निवेदक संघटनेच्या वतीने बहिष्कार टाकण्यात येईल. लग्नातील फोटोग्राफी हा क्षण लग्नाची आठवण आयुष्यभर टिकून राहतात म्हणून फोटो ग्राफरला फोटो काढण्यास स्टेजवर पदाधिकारी यांनी सहकार्य करावे. ग्रामीण भागातील गरीब निवेदक हे स्वताचा खर्च करून कार्यक्रम स्थळी वेळ काढून येतात व निवेदन करतात त्यांना मानधन देण्यात यावे. निवेदकांचा मोफत विमा संघटनेच्या मार्फत काढण्यात येईल, यांसारखे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

संघटनेची कार्यकारणी खालीलप्रमाणे
संस्थापक – गुलाबराव वाघोले, गणेश विनोदे, रामदास वाडेकर
सल्लागार – तानाजी पडवळ, बजरंग जाधव, वाघुमामा नवघणे, शांताराम ढाकोळ, नानासाहेब घोजगे  प्रभाकर तुमकर
उपाध्यक्ष – दत्तात्रय असवले, शरद सावंत, रंगनाथ चव्हाण
खजिनदार – कल्पेश भोंडवे
प्रसिद्धीप्रमुख – विजय काजळे
संघटक – दिलीप गावडे, तानाजी शेंडगे, राजेश राऊत, संदीप तिकोने, प्रवीण मुर्हे
कार्यकरणी सदस्य – अनिल महाराज वाजे, रामहरी गायकवाड, संदिप सातकर, सोमनाथ शिंदे, भानुदास जांभुळकर, प्रवीण ढोरे, योगेश माझीरे, बजरंग वावरे, नामदेव तुपे, अशोक ठुले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.