Pune – पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने चौघांनी केला तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून तरुणाचा धारदार शस्त्राने चौघानी मिळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी (दि.24) रात्री 11 च्या दरम्यान वानवडी येथील शांतीनगर समोरील काटवनात घडली आहे.

रविंद्र ऊर्फ खन्ना रामु परदेशी (वय 28, रा.वानवडी गाव) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.बबलू ऊर्फ हैदर परदेशी (वय 26, पदमव्हीला सोसायटी, वानवडी), अक्षय विनोद कांबळे (रा.वानवडी बाजार, पुणे) आणि त्यांचे दोन साथीदार अशी यातील आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी सबॅस्टिन जॉन (वय 31, रा.वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि रविंद्र हे वानवडी येथील शांतीनगर समोरील काटवनात काल रात्री दारू पीत बसले होते. रविंद्रचे ऑक्टोबर 2018 मध्ये अक्षय आणि बबलू यांच्यात वाद झाले होते. त्या भांडणामध्ये रविंद्रने अक्षयला दगडाने मारहाण करून शिवीगाळ केली होती. या भांडणाचा राग मनात धरून काल रात्री बबलू आणि अक्षय यांनी संगनमत करून रविंद्र याचा धारदार शस्त्राने वार करून खून केला . याप्रकरणी पोलिसांनी बबलू परदेशी याला अटक केली असून पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.