Hinjawadi : पोलीस ठाण्यात आरोपीचे पोलिसांशी गैरवर्तन

एमपीसी न्यूज – तक्रार देण्यासाठी आलेल्या सास-याला तक्रार देऊ नको अशी धमकी दिली. याबाबत पोलीस समाजवण्यास गेले असता आरोपीने पोलिसांशी गैरवर्तन केले. तसेच पोलीस करत असलेल्या कामात अडथळा केला. ही घटना सोमवारी (दि. 24 ) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाण्यात घडली.

पोलीस हवालदार अविनाश विठ्ठल बोराटे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रवीण बापू कसाळे (वय 27, रा. माण ग्रामपंचायत समोर, माणगाव, हिंजवडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण कसबे पत्नीला मारहाण करीत असल्याने त्याच्या पत्नीने हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्या गुन्ह्यात समज देण्यासाठी प्रवीण याला पोलीस ठाण्यात बोलावले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला सोडून दिले. त्यानंतर प्रवीण याने घरी जाऊन त्याच्या सास-यांना मारहाण केली. त्यामुळे त्याचे सासरे हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. आरोपी प्रवीण सास-यांच्या मागून पोलीस ठाण्यात आला आणि सास-यांना तक्रार देऊ नका म्हणून धमकाऊ लागला. हा सगळा प्रकार पोलीस ठाण्यात सुरु असल्याने पोलीस हवालदार अविनाश बोराटे यांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्याशी गैरवर्तन केले. बोराटे करीत असलेले सरकारी काम बंद पाडले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.