Dapodi: महापालिका उभारणार  7143 सदनिकांचा गृहप्रकल्प; दोन हजार कोटींचा खर्च

36 इमारतींचा समावेश; शहर सुधारणा समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडीतील जयभीमनगरमधील झोपडपट्टीधारकांचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन केले जाणार आहे. त्याकरिता 36 इमारतींमध्ये एकूण 7 हजार 143 सदनिका बांधण्याच्या सुधारित खर्चाच्या उपसूचनेला शहर सुधारणा समितीच्या विशेष सभेत आज (गुरुवारी)  मान्यता देण्यात आली. याकामासाठी 1 हजार 757 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. जागा मालककडून  जमीन खरेदी केली जाणार असून त्यासाठी 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

सभापती सीमा चौगुले यांया अध्यक्षतेखाली शहर सुधारणा समितीची विषेश सभा आज पार पडली.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 71 झोपडपट्टया असून, आतापर्यंत महापालिकेच्या वतीने जेएनएनयूआरएमअंतर्गत 9 गृहप्रकल्प राबविण्यात आले आहेत. प्रकल्प राबविलेल्याव्यरिक्‍त अन्य झोपडपटट्यांसाठी मेसर्स एम.एम. प्रोजेक्‍ट कन्सल्टंटस्‌ प्रा. लि. यांनी झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्प सादर करून त्याचे सादरीकरण केले आहे. मात्र, महापालिका हद्दीत प्रायोगिक तत्वावर क्‍लस्टरवाईज झोपडपट्टयांची विभागणी करून प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्याकरिता अन्य झोपडपट्टयांच्या पुनर्वसनाकरिता या सल्लागाराने सुमारे 3000 हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. या सल्लागाराने क्‍लस्टर एकमध्ये भाटनगर पुनर्निमाण प्रकल्प व क्‍लस्टर दोनमध्ये दापोडी येथील सिध्दार्थनगर, जयभीमनगर, गुलाबनगर, महात्मा फुलेनगर, लिंबोरेवस्ती या झोपडपटट्यांचा समावेश आहे. दुस-या क्‍लस्टरमधील झोपडपटट्यांचा पुनर्वसन अहवाल सादर करण्याचा प्रस्तावासह 1 हजार 957 कोटींच्या सुधारित खर्चाची उपसूचना शहर सुधारणा समितीमध्ये मंजुर करण्यात आली आहे.

या प्रकल्पामध्ये लभार्थींना 269 चौ. फूटांची सदनिका दिली जाणार आहे. यामध्ये विक्रीच्या क्षेत्रफळाचा समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय त्यामोबदल्यात कोणताही टिडीआर दिला जाणार नाही. या प्रकल्पासाठी गुगल मॅपनुसार एकूण 6 हजार 693 झोपडपट्टया आढळल्या आहेत. तर विकसकाला एकूण 36 गृहप्रकल्पांमधून 7 हजार 143 सदनिका बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ 296 चौ फूट असले, तरीदेखील विक्रीसाठी 300 ते 800 चौ. फूट क्षेत्रफळ उपलब्ध असणार आहे. या प्रकल्पाची मूळ किंमत 910 कोटी असून, सुधारित किंमत1 हजार 757 कोटी एवढी धरण्यात आली आहे.

हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रकल्पातील लाभार्थ्यांचे तात्पुरींत्या स्वरुपात निवारा शेडमध्ये स्थलांतर केले जाणार असून, यादरम्यान त्यांना सर्व नागरी सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत. अथवा रोख रक्कम देण्याचे प्रयोजन करणण्यात आले आहे. यापैकी कोणत्याही एका पर्यायाची लाभार्थी निवड करू शकणार आहेत.

असे असणार आहे कामाचे स्वरूप, खर्च!

पुनर्वसन/ पुनर्विकासाकरिता – 800 कोटी
सुविधांकरिता- 16 कोटी
तात्पुरता निवारा- 23 कोटी
रहिवासी सदनिका- 760 कोटी
विक्रीसाठी सदनिका- 81 कोटी
मुलभूत सुविधा- 77 कोटी
जागा मालकाकडून जमीन विकत घेणे- 200 कोटी
एकूण प्रकल्प किंमत- 1957 कोटी

प्रकल्पाच्या बांधकाम खर्चाचा तपशील!

पुनवसनाकरिता येणारा बांधकाम खर्च- 3360 प्रति चौ.फूट चटईक्षेत्रावर
पुनर्विकास येणारा बांधकाम खर्च- 2100 प्रति. चौ. फूट सुपर बील्टअप एरियावर
विक्रीसाठी येणारा बांधकाम खर्च – 3560 प्रति. चौ. फूट चटईक्षेत्रावर
विक्रीसाठी येणारा बांधकाम खर्च – 2300 प्रति. चौ. फूट रसुपर बील्टअपक्षेत्रावर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.