BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : नाना नानी पार्क हास्यसंघाचा चतुर्थ वर्धापन दिन साजरा

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- कलापिनी संचालित नाना नानी पार्क हास्यसंघाचा चतुर्थ वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला.

या प्रसंगी मावळ प्रबोधिनीचे रवींद्र अप्पा भेगडे, उद्यमान नगरसेवक अमोल शेटे, डॉ अनंत परांजपे, डॉ शाळीग्राम भंडारी, महेशभाई शाह व तळेगाव निरंकारी भवन प्रमुख नारायण शिंदे हे उपस्थित होते.

नटराज पूजन व गणेशवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नाना नानी हास्ययोगाचे प्रवर्तक कै. दिनकर मायभाटे यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर सुनीता बकरे यांनी हास्यसंघाचा अहवाल सादर केला. यावेळी त्या म्हणाल्या की, या हास्यसंघात 90 ते 100 महिला लाभ घेतात. ‘हास्यसंघाशी करा गट्टी, औषध गोळ्यांना मिळेल सुट्टी’ याचा अनुभव घेत हसत हसत व्यायाम करून अनेक व्याधींपासून मुक्ती त्यांनी मिळविली आहे.

नंदा काळे व अशा जैन यांनी पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात केला. रवींद्र अप्पा भेगडे व अमोल शेटे यांनी कलापिनीचे महिलांसाठी 4 वर्षांपासून चालू असलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक करून हास्यसघास सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले. डॉ परांजपे व डॉ भंडारी यांनीही आपल्या खुमासदार शैलीत मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.

हास्यसंघाच्या आरती शिंत्रे आणि सहकारी यांनी ‘आता काय सांगताय डॉक्टरला’, हे नृत्य सादर केले. जे करायला नको ते करायचे, जे खायला नको ते खायचे आणि त्रास झाला की डॉक्टरांकडे धावायचे याचे छान वर्णन या गीतामध्ये सादर केले. उज्वला शेटे व गीता वालावलकर यांनी नव्या जमान्यातील भावजय व जुन्या पिढीची नणंद यांचे ठसकेदार संवाद तर वंदना सोनवणे आणि सहकारी यांचे ‘माऊली माऊली’ गाण्यावरील बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.

अशोक बकरे यांनी सूत्रसंचालन केले. संगीता यादव यांनी आभार मानले . अशोक बकरे यांच्या हसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.