Talegon dabhade : ऋतुजा सुर्वे हिची राष्ट्रीय वुशू स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई

एमपीसी न्यूज- 64 व्या शालेय राष्ट्रीय वुशू स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील ऋतुजा अनिल सुर्वे हिने 17 वर्षाखाली 56 वजनी गटामध्ये कांस्य पदकाची कमाई केली. तिने झारखंड व पंजाबच्या खेळाडूंना पराभूत करून यश संपादित केले.

दि 11 ते 13 जानेवारी या कालावधीमधे रांची झारखंड येथे ही स्पर्धा पार पडली. ऋतुजा सुर्वे हिने आतापर्यंत एकूण 71 पदके मिळवली असुन त्यामधे 66 सुवर्ण 3 रौप्य व 2 कांस्य पदकांच समावेश आहे. ऋतुजा ही माऊंट सेंट हायस्कूलची विद्यार्थिनी आहे.

ऋतुजा सुर्वे ही तळेगाव दाभाडे येथील ‘दाभाडे मार्शल आर्ट’ मध्ये प्रशिक्षक सुभाष दाभाडे यांच्याकडे गेल्या सहा वर्षापासून या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.