Sports News : धावपटू प्रिया पाडाळे हिला राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक

एमपीसी न्यूज – धावपटू प्रिया सागर पाडाळे हिने नुकत्याच पार पडलेल्या (Sports News) नवव्या स्टुडंट्स ऑलम्पिक नॅशनल गेम्स स्पर्धेत 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक मिळविले. तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून आंतरराष्ट्रीय स्पर्धा जून महिन्यात श्रीलंका येथे होणार आहेत.

शनिवार (दि. 15) आणि रविवारी (दि. 16) नवी दिल्ली येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये नववी स्टुडंट्स ऑलम्पिक नॅशनल गेम्स पार पडली. यात महाळुंगे येथील ग्लोबल इंटरनॅशनल स्कुलमधील दहावीची विद्यार्थिनी प्रिया पाडाळे हिने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेच्या दोन फेऱ्या झाल्या. शनिवारी झालेल्या पहिल्या फेरीत प्रियाने चांगली कामगिरी केल्याने तिची रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली. स्पर्धेत देशभरातून आलेले 60 स्पर्धक होते. रविवारी अंतिम फेरी झाली असता त्यात तिला राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला.

Pune : गुंडांच्या टोळीकडून तरुणावर तलवार हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न

प्रिया पाडाळे हिला लहानपणापासून खेळाची आवड आहे. पाचवीत असताना तिने जिम्नॅस्टिक स्पर्धांमध्ये सहभाग घेत जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवले. त्यांनतर सहावीत असताना तिने धावण्याचा सराव सुरु केला. रवींद्र त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली ती बालेवारी क्रीडा संकुल येथे सराव करत आहे. तिला आजवर जिल्हा, विभागीय आणि राज्य स्तरावर अनेक बक्षिसे मिळाली आहेत.

राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने तिची भारतीय संघात निवड झाली आहे. जून महिन्यात श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्या स्पर्धेसाठी प्रिया जाणार असून तिचा जोरदार सराव सुरु आहे. प्रियाचे वडील सागर पाडाळे हे सामाजिक कार्यकर्ते असून महाळुंगे-पाडाळेगाव येथील गणपती दान योजनेचे जनक, श्री फाउंडेशनचे संस्थापक आहेत.

प्रिया पाडाळे म्हणाली की, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन तिथेही चांगली कामगिरी करण्याची इच्छा आहे. त्यासाठी दररोज चांगली तयारी सुरु आहे. प्रशिक्षक दररोज सराव करून घेत आहेत. राष्ट्रीय प्रमाणेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील (Sports News) यश मिळेल अशी आशा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.